दीड वर्षाच्या बालकावरील शस्त्रक्रिया यशस्वी: अन्न नलिकेत अडकलेली पिन काढण्यात यश

0

शिरपूर:धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवघ्या दीड वर्षाच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात आली.

नाक, कान, घसा विभागाचे अधिव्याख्याता डॉ . जसराज स्मीत भावसार यांनी ही शस्त्रक्रिया केली.भुलतज्ज्ञ डॉ. जया दीघे यांचे त्यांना सहकार्य लाभले. विभाग प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही अवघड शस्त्रक्रिया करून त्यांनी  बालकाचे प्राण वाचविले.

शिरपूर तालुक्यातील हिंगोणी येथील पवन नाना पावरा हा बालक गंभीर अवस्थेत शनिवारी रात्री दाखल झाला होता. रविवारी त्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून पिन काढण्यात आली. अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सुर्यवंशी, समन्वयक डॉ.दीपक शेजवळ यांनी विभागप्रमुख डॉ.सुनील देशमुख व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सर्वोपचार रुग्णालयात याआधीही अशा अवघड शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Copy