दीड लाखाचे बोगस बीटी बियाणे जप्त; कंपनी मालक व विक्रेत्यावर गुन्हा दाखल

2

शिरपूर:तालुक्यातील चांदपुरी येथे एकाकडून कृषी विभागाने बोगस बीटी बियाणे जप्त केलेले आहे. याप्रकरणी कृषी विभागाने कारवाई करत एक लाख ६४ हजार रुपयाचे बोगस बीटी बियाणे हस्तगत केले आहे.

संपूर्ण देशात कोरोना चे भीषण संकट सुरू आहे. अशातही तालुक्यातील चांदपुरी येथील किरण नरोत्तम पटेल यांनी कापसाचे बोगस बीटी बियाणे विक्रीसाठी ठेवले होते. याची माहिती कृषी विभागाला मिळाली त्यानंतर कृषी विभागाने कारवाई केली आहे.
जिल्हा कृषी विभागाचे अधीक्षक विवेक सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील चांदपूरी येथे किरण नरोत्तम पटेल याने राहत्या घरात एचटी बीटी कापूस बियाणे साठवलेले आहे. हे विनापरवाना विक्री करीत आहेत. यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी शिरपूर तालुका कृषी अधिकारी अनिल पोलाद निकुंभ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन आर पाटील यांच्यासह जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांनी सापळा रचून किरण नरोत्तम पाटील यांच्या घरी गेले. किरण पटेल यांच्या घरात आर-कॉट बीटी बियाण्याचे १५२ पॉकेट आर कॉट सीड्स कंपनी गुजरातचे एक लाख दहा हजार ९६० रुपये किमतीचे आर कॉट टॅटू ७३ पाकिटे ५३ हजार दोनशे ९० रुपये असे एकूण एक लाख ६४ हजार दोनशे पन्नास रुपयाचे बियाणे आढळून आले.
सदर कापूस बियाण्याला महाराष्ट्र राज्यात परवानगी नाही.हे बियाणे तननाशक बीटी बियाणे म्हणून विक्री करण्यात येत होते. यामुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज रमेश शिसोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांदपुरी येथील किरण नरोत्तम पटेल यांच्यासह आर कॉट सीड्स कंपनी कलोल गुजरात या कंपनीचे मालक व त्यांच्यावरील जबाबदार व्यक्ती शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Copy