दीडशे फुट खोल दरीत कार कोसळुन अमळनेरच्या पोलीस उपअधीक्षकांचा मृत्यू

0

नाशिक जिल्ह्यात वडाले भोई गावाजवळ अपघात

जळगाव: – दीडशे फूट खोल दरीत कार कोसळून जिल्हा पोलीस दलातील तथा अमळनेरचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई गावाजवळ गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते गावाकडे
अमळनेर शहरासह तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे हे दोन दिवसापूर्वी रजा टाकून आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि नियमित आरोग्य तपासणी करीता ते नाशिक येथे गेले होते. स्वत: कार चालवित ते कारने जात असतांना वडाले भोई जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार सुमारे १५० फूट दरीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वर्षभरापुर्वीच अमळनेरला झाले होते रुजु

राजेंद्र ससाणे यांचे पोलिस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाल्यावर नाशिक येथील प्रशिक्षणानंतर ते अमळनेर येथे एक वर्षापूर्वी रूजू झाले होते. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे अधिकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. अशा अधिकार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने जिल्हा पोलिस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Copy