दिव्यांग सोहळ्यातून मानवतेची गुंफण

0

जळगाव। दिव्यांग सोहळ्यातून मानवतेची गुंफण झाली आहे. देव्हार्‍यात लोक देवाची पूजा करतात. मात्र कलियुगात देखील शंकर बाबा पातळकरान सारखे लोक असून त्याची पूजा केली पाहिजे. दिव्यांग कायदा झाल्यास त्याचे पहिले श्रेय जळगाव जिल्ह्याला जाईल असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्रसंगी केले. रोटरी क्लब आयोजित दिव्यांग चि.सौ.का. मंगल व चि. योगेश यांच्या मंगल विवाह शहरातली खानदेश सेंन्ट्रल मॉल परीसरात लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग मंगल व चि. योगेश यांना आशिर्वाद देण्यासाठी यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन , खासदार आनंद अडसूळ ,आमदार राजूमामा भोळे, जैन उदयग समूहाचे अशोक जैन, जिल्हाधिकारी निंबाळकर, महापौर नितीन लड्ढा, डॉ.राजेश जैन, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, डॉ.राधेशाम चौधरी, आयुक्त जीवन सोनवणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, सुशील अत्रे, रतनलाल बाफना, नगराध्यक्ष साधना महाजन, जि.प. अध्यक्ष उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राधेश्याम चांडक, महाराष्ट्र लोक माहिती आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, करीम सालार, गफ्फार मलिक, अधिक बच्छाव, उपमहापौर ललित कोल्हे, सत्यपाल महाराज, रोटरीचे प्रमुख महेश मुकलकर आदी मान्यवर तसेच जळगावकर मंगल विवाह प्रसंगी उपस्थित होते.सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बोडोले व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी दिली भेट
स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृह, वझ्झर, ता. अचलपूर (अमरावती) येथील शंकरबाबा पापळकर यांची 19वी मानसकन्या दिव्यांग मंगल व योगेश यांचा विवाह सोहळा रविवारी सायंकाळी 6 वाजता शहरातील खान्देश मॉल परीसरात उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यास वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंत्री बडोले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास पद्मालय विश्रामगृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी वधुवरांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद दिले. यावेळी आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, रोटरी क्लब जळगाव वेस्ट चे अध्यक्ष योगेश भोळे, डॉ. राजेश पाटील, अनिल कांकरीया, रमण जाजू यांच्यासह आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानवतेसाठी शंकरबाबाचे कार्य
अपंग व्यक्तीच्या साठी शंकरबाबाचे कार्य प्रेरणादायी असून सगळ्यांनी त्याच्या कडून शिकवण घेतली पाहिजे. मानवतेच्या कल्याणासाठी मोठे पाऊल उचलेगेले आहे. दिव्यांग कायद्यासाठी नक्कीच राज्य सरकार आणि भारत सरकार प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केल्या. -सुरेशदादा जैन, माजी मंत्री

दिव्यांग कायद्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
दिव्यांग मंगल सोहळा इतिहासीक असून शंकर बाबा पापडकर यांच्या कडून समाजकार्याची प्रेम घेतली पाहिजे. समाजासाठी आपण देणं लागतो. हे स्व वडील भरवलाल जैन यांनी शिकवण दिली आहे. दिव्यांगांच्या कायद्यासाठी लोकपतिनिधींनी प्रयत्न केले. पाहिजे स्थानिक आमदारांना आमची विनंती राहील त्यांनी हा मसुदा विधान भवनात मांडवा याचा फायदा दिव्यांग लोंकाना होणार आहे.
-अशोक जैन

कौशल्यासाठी प्रशिक्षण देणार
दिव्यांगांच्या वर्गवारी पूर्वी चार होत्या त्याच वर्गवारी आज 21 करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी नोकर्‍यांमधील आरक्षणही 4 टक्क्यांपर्यंत केंद्र सरकारने वाढवले आहे. दिव्यांगांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांच्यादृष्टीने योग्य कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न होत आहेत. दिव्यांगांच्या संगोपनासंदर्भात कायद्यातील सुधारणेचा विषय आपण लोकसभेत मांडू.
-आनंदराव आडसूळ, खासदार,अमरावती

पापळकर बाबा झाले भावुक 
130 दिव्यांगांची जबाबदारी सांभाळणार्‍या माणसाचे दर्शन मंगल सोहळ्यात झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी व्यापिठावर येण्याचे आवाहन केले असता त्यांचा शंकर पापळकर 29 व्य मुलीचा विवाह सोहळा पाहताना भावुक झाले होते. वर योगेश याला राधेशाम चांडक यांनी बँकेत नौकरी दिली याबद्दल शंकर बाबा पापळकर यांनी राधेशाम चांडक यांचे जाहीर आभार मानले. यावेळी चांडक यांचा पापळकर बाबाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे यांनी दर वर्षी 1 लाखाची मदत जाहीर केली असता ती मदत पापळकर बाबा यांनी नाकारली त्यांनी पैसे दिले तर परत करण्यात येतील. आम्हाला पैसे नको मात्र वझर या ठिकाणी एक वेळा सगळ्यांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. विवाह सोहळ्यास मदत करणार्‍या दात्याचे तसेच रोटरी क्लब जळगावचे त्यांनी आभार मानले.