दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी जळगाव जि.प.समोर अर्धनग्न आंदोलन

दिव्यांग बांधवांचे आंदोलन म्हणजे जिल्हा परीषद प्रशासनच्या अपयशाची पोच पावती : डॉ.विवेक सोनवणे

जळगाव/मुक्ताईनगर : जिल्हा प्रशासनाच्या दिव्यांगांच्या बाबतीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परीषद, जळगाव येथे अर्धनग्न अवस्थेत जाहीर निषेध आंदोलन झाल्याने खळबळ उडाली. 14 व्या वित्त आयोगातून मिळणारा 5 टक्के हा दिव्यांगांवरती खर्च न होत असल्यामुळे विना अट घरकुल योजनांचा या लाभार्थींना मिळावा, शासकीय स्थरावर व स्थानिक स्थरावर दिव्यांग बांधवांची नोंद व्हावी, 5 टक्के निधी हा थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा व्हावा, मालमत्ता करात दिव्यांगांना 50 टक्के सूट देण्यात यावी, 15 व्या वित्त आयोगातून 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे यासह 11 मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आमदार खोत यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा
यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वतः दालनातून बाहेर येऊन आंदोल कर्ते डॉ.विवेक सोनवणे व सर्व दिव्यांग बांधवांची भेट घेऊन पार पडणार्‍या पंचायत राज समिमीच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले. जिल्हा परीषदेच्या दालनात पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल, सदाभाऊ खोत, पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अनिल भाईदास यांच्यासह पंचायत राज मधील संपूर्ण 40 आमदारांच्या व जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिया यांच्या माध्यमातून निवेदन स्वीकारून आताच मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्हाभरातील मागण्या या पंचायत राज समितीच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली. यावेळी डॉ.विवेक सोनवणे, उत्तम जमळे, रजनीकांत बारी, राजेश चौधरी, महेश महाजन, विजय बारी, कैलास महाजन, निलेश पाटील, रूपसिंग राजपूत, उत्तम कोळी, नामदेव पाटील, एकनाथ कोळी, पंडित पाटील, राम सोनार, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

Copy