दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

जळगाव। दिव्यांगाचे शुक्रवार 12 मे रोजी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातून आंदोलनाचे नेतृत्व करण्यात आले. यामध्ये विधवा महिला,अपंग, अंध, रोगग्रस्त,परितक्त्या यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या बाबत लेखाजोखा जिल्हाधिकार्‍यान देण्यात आला आहे. अनेक योजना मधून अपंग बांधव जीवन जगत असल्याने अनेक सरकारच्या योजना चा फायदा मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

या आहे दिव्यांग बांधवाच्या मागण्या
विधवा, अपंग, परीव्याक्ता, अंध, रोगग्रस्त महिला-पुरूष लाभार्थींना 21 हजाराचा उत्पन्नाचा दाखला मिळावा, सर्कल चौकशी थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. .तहसिलदार यांच्याकडून उत्पन्न दाखला 3 दिवसात देण्यात यावा,संजय गांधी योजनेच्या लाभार्थीना रिकाम्या किंमी फिरवण्यात येते याबाबत त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी. , तसेच विधवा, अपंग यांच्या वयाची अट शिथील करण्यात यावी ,प्रलंबित संजय गांधी योजनेचे प्रकरणे निकाली काढावीत,प्राधान्य, अन्नपुर्णा योजनेचा लाभ अपंगांना देण्यात यावा, अपंगांना बेरोजगार निर्मित करावा,अपंगांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा. ,अपंग, विधवा, रोगग्रस्त यांना पिवळे कार्ड देण्यात यावे. ,प्रतिज्ञापत्र स्कॅनिंगची अट शिथिल करून अनुदानात वाढ करणे. संजय गांधी योजना समितीच्या लोकांची वशिलेबाजी थांबविण्यात यावी. अपंग, विधवा प्रकरणे कुठल्याही ग्रा.पं. सदस्य, पुढारी यांच्याकडून प्रकरणे स्विकारू नये. अशा विविध मागण्या आंदोलकांच्या द्वारे करण्यात आल्या आहे. अध्यक्ष अशोक बाविस्कर यांचे नेतृत्वाखाली वरील मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा ईशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.