दिवसभरात जितके कोरोनामुक्त तितकेच नवीन रुग्ण

0

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 285 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 11 हजार 388 झाली आहे. सर्वाधिक 75 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 284 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात शनिवारी नव्याने 285 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 75, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 12, अमळनेर 16, चोपडा 20, पाचोरा 23, भडगाव 11, धरणगाव 25, यावल 1, जामनेर 35, रावेर 9, पारोळा 6, चाळीसगाव 27, मुक्ताईनगर 6, इतर जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 4, अमळनेर तालुक्यात 2, एरंडोल, जळगाव, यावल तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा मृत्यू आहे अशी, माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy