दिल्लीहुन परतुन जळगावात वास्तव्यास रत्नागिरीच्या दोघांना पोलिसांनी पकडले

1

रामानंदनगर पोलिसांची कारवाई : जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल

जळगाव – दिल्ली येथील कार्यक्रमाहुन परतून जळगावात पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळ एका खोलीत वास्तव्यास असलेल्या दोघांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले . दोघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, मूळ रत्नागिरी येथील रहिवासी दोघे दिल्ली येथील निजामुद्दीन येथे कार्यक्रमाला गेले होते. तेथुन दोघेही काही दिवसांपुर्वी जळगावात परतले. यानंतर दोघेही जळगाव शहरातील प्रिंपाळा परिसरातील मशीदिजवळ एका खोलीत राहत होते.

दोघांनी दिल्ली येथुन परतल्याच्या माहितीसह स्वत:ची अोळख लपविली. या दोघांबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना गोपनीय माहिती मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी गंभीर दखल घेतली. यानंतर सतीश डोलारे, अनिल फेगडे, राकेश दुसाने या कर्मचार्‍यांसह पिंप्राळा परिसरात संबंधित दोघांचा शोध घेतला. दोघांना पोलीस वाहनातुन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले.

रत्नागिरी येथील दोन जण दिल्ली येथील कार्यक्रमाहुन परतल्यानंतर पिंप्राळा परिसरातील मशीदीजवळ वास्तव्यास होते. दोघांबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानुसार दोघांना कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

अनिल बडगुजर, पोलीस निरिक्षक, रामानंदनगर पोलीस स्टेशन
Copy