दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम

0

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिली होती. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज, अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला गेला. तरीही आंदोलक शेतकऱ्यांनी मोर्चा सुरूच ठेवला. अखेर आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबरला चर्चेसाठी बोलविले आहे.

आंदोलनकर्ते शेतकऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शासकीय कामात अडथला आणणे, पोलिसांवर हल्ला करण्याचा गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे पुन्हा संताप व्यक्त होत आहे. कृषी विधेयकाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचे आदोलन सुरु आहे. आज झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

Copy