दिलीप कुमार यांना न्युमोनिया; रुग्णालयात केले दाखल

0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्युमोनिया झाला असून रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली आहे.

दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैसल फारूखी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘रविवारी रात्री दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्युमोनिया झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ट्विटरद्वारे कळवण्यात येईल.’ असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय. दिलीप कुमार सध्या ९५ वर्षांचे आहेत. गेल्या महिन्यात ५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना तब्बल १४ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

Copy