दिलासा: वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

0

मुंबई: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंठपीठासमोर याचिकांवर सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीनंतर अशोक चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली. “मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीच्या दरम्यान आणि जो सुनावणीचा शेवट झाला. त्यामध्ये एक समाधानाची बाब अशी की, याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल प्रवेशासंदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी, अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यास नकार दिला अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Copy