दिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात रविवारी ५९६ रूग्ण आढळून आले असुन १६ रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ८९७ झाली आहे. रविवारी सर्वाधिक १०० रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे ६०५ रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत.

जिल्ह्यात रविवारी नव्याने ५९६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर १००, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ ८८, अमळनेर ७, चोपडा ५५ , पाचोरा २०, भडगाव २६, धरणगाव २७, यावल ३९, एरंडोल २४, जामनेर ४२, रावेर २८, पारोळा ३६, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर २४, बोदवड ९ इतर जिल्ह्यातील १० याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात १६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर तालुक्यात ५, पारोळा, चोपडा तालुक्यात प्रत्येकी २, जळगाव, जळगाव ग्रामीण, जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, रावेर, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एक बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy