दिलासादायक : राज्यात दररोज १३ टक्के रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाचे हॉटस्पॉट १४ वरुन ५ वर

0

मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. तर केवळ एक टक्के रुग्णच अत्यवस्थ असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात काल १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसाला २६ रुग्ण बरे होत राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा ७वरून ५वर आला आहे. राज्यात दररोज सुमारे ७ हजार करोना चाचण्या केल्या जातात. काल ७११२ चाचण्या केल्या. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो ७ दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

हॉटस्पॉट १४ वरुन ५ वर

राज्यात सुरुवातीला एकूण १४ हॉटस्पॉट होते. आता ही संख्या ५वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे महानगर परिसर, नागपूर आणि नाशिक असे हॉटस्पॉट असून मालेगाववरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. संस्थात्मक क्वारंटाइन आपण वाढवतो आहोत. समजा रुग्णांची संख्या वाढली तर आपली तयारी असावी तरीही आपण सगळी तयारी करतो आहोत. धारावीत होम क्वारंटाइन शक्य नाही. त्यामुळे ज्यांना करोनाची लक्षणं दिसत असतील तर समोर या असे आवाहन राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केले.

Copy