दिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला

0

जळगाव शहरात सर्वाधिक १४० रूग्ण

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने ४४६ रूग्ण आढळून आले असुन ४ रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४५ हजार ४२९ झाली आहे. सर्वाधिक १४० रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे ८०३ रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत.

जिल्ह्यात नव्याने ४४६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर १४०, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५५, अमळनेर ११, चोपडा ५३, पाचोरा ७, भडगाव १४, धरणगाव २४, यावल ५, एरंडोल ५, जामनेर २२, रावेर ११, पारोळा १०, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १९, बोदवड ७ इतर जिल्ह्यातील ९ याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ, चोपडा, पाचोरा, यावल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy