दिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

0

नव्याने २६१ रूग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रूग्णसंख्येत होणारी घट ही जिल्ह्याच्या दृष्टीने नक्कीच दिलासादायक आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आज नव्याने २६१ रूग्ण आढळून आले असुन ९ रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ९०७ झाली आहे. सर्वाधिक ३२ रुग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दुसरीकडे ८७८ रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत. यात जळगाव शहर २८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २६, अमळनेर ३२, चोपडा १६, पाचोरा ९, भडगाव ७, धरणगाव १९, यावल ४, एरंडोल ३, जामनेर २१, रावेर २९, पारोळा ७, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ११, बोदवड ४ इतर जिल्ह्यातील २ याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ३, अमळनेर तालुक्यात २ तर चाळीसगाव, रावेर, यावल, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy