दिलासादायक: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्वाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव : कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २० जणांसह आणि चार नवीन संशयित दाखल अशा २७ जणांचे तपासणि अहवाल मंगळवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाल्यास सर्वच सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील २० जणांसह जिल्हारुग्णालयात दाखल नवीन संशयित अशा २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . पॉजिटिव रुग्णाच्या संपर्कातील संशयितांच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, हे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले . पॉजिटिव रुग्णांच्या संपर्कातील संशयितांसह इतर सर्व सर्व २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती डॉ. भास्कर खैरे यांनी जनशक्तीची बोलताना दिली. दरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झालेल्या संशयितांचा अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे.

Copy