Private Advt

दिग्दर्शक अली अकबर त्याग करणार इस्लाम धर्म

नवी दिल्ली – मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक अली अकबर स्वधर्मियांकडून खूप दुखावलेले गेले  असून ते आपल्या इस्लाम धर्माचा त्याग करत आहेत. यामुळे चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

 

झाले असे आहे कि , सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. एकीकडे देशभरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचा श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुसरीकडे काही कट्टरपंथी लोकांनी बिपिन रावत यांच्या निधनानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळेअशा परिस्थितीत आता अली अकबर यांनी मुस्लिम धर्म सोडण्याची घोषणा केली असून लवकरच पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. दिग्दर्शक अली अकबर यांनी फेसबुक लाईव्हवर ते इस्लामचा त्याग करत आहे असे म्हटले.