दारूच्या दुकानासाठी आता 1 किमी स्थलांतराची परवानगी

0
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परिपत्रक जारी
मुंबई : देशी आणि विदेशी दारूचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी आता राज्य सरकारने एक किलो मीटरची नवी अट घातली असून, यापुढे असा परवाना स्थलांतरीत करावयाचा असल्यास एक किलो मीटरवर दारूचे दुकान असल्यास असा परवाना स्थलांतरीत होवू शकणार नाही. राज्य सरकारने तशी अधिसूचना आज जारी केली आहे.
राज्यात सुमारे २०० देशी विदेशी मद्याच्या दुकानदारांनी परवाने स्थलांतरीत करण्याची परवानगी मागितली आहे. अशी परवानगी मागणारी अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने अनेक परवानाधारकांनी न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली आहे. आता राज्य सरकारने नियमामध्ये सुधारणा केली असून, या नविन नियमांना महाराष्ट्र देशी विदेशी मद्य नियम ( सुधारणा ) २०१८ संबोधण्यात येईल. त्यानुसार देशी अथवा विदेशी मद्याचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी एक किलो मीटरची अट टाकण्यात आली आहे. एक किलोमीटर मध्ये यापूर्वी देशी विदेशी मद्याचे दुकान असल्यास नव्याने अशा ठिकाणी परवाना स्थलांतरीत करता येणार नाही.या नव्या नियमांची अंमलबजावणी ३ ऑक्टोंबर २०१८ पासून करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील अनेक परवाने शहरी भागात स्थलांतरीत करण्यात यावी अशी परवानगी मागितली असल्याने असा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यातील विविध जिल्ह्यात असणारे देशी विदेशी मद्यांचे परवाने विविध कारणांनी बंद आहेत. परंतु असे परवान्यांचे नुतणीकरण करण्यात आले नसल्याने ते बंद स्थितीत आहेत.अशा सुमारे २०१ मद्याच्या दुकानांच्या परवान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार अशा मद्याच्या दुकानांचा लिलाव करण्यात येणार आहे.ज्या जिल्ह्यात दुकान मंजूर आहे परंतु परवाना सुरू नाही अशा परवानाचा लिलाव हा संबंधित जिल्ह्यातच करण्यात येणार आहे.
Copy