दारुच्या नशेत फवारणीचे औषध प्राशन

0

जळगाव । करंजी ता.बोदवड येथील सुरेश भगवान पाटील या 45 वर्षीय इसमाने दारुच्या नशेत कपाशीवरील फवारणीचे औषध 20 रोजी दुपारी प्राशान केले असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरेश पाटीलचे मुळगाव करंजी असून तो सुरत येथे वास्तव्यास आहे.घरी देवाचे कार्यक्रम असल्याने तो व त्याची मुलं करंजीला आले होते.परंतु कार्यक्रम आटोपल्या नंतर त्याची मुलं आणि पत्नी सुरतला निघून गेले. आज दुपारी दरवाजा बंद करुन त्याने विष प्राशान केले. त्यास शेजारील लोकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.