दारुची दुकानं बंद असल्याने ५ जणांची आत्महत्या

0

तिरुवनंतपुरम – भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात दारुची दुकाने बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये गेल्या ५ दिवसांमध्ये ५ जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Copy