दाभोळकर हत्येप्रकरणी आरोपींच्या कोठडीत पुन्हा वाढ

0

मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अमोल काळेसह त्याच्या २ साथीदारांना न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अमोल काळेचे नाव पुढे आल्यानंतर त्याच्या चौकशीतून पुण्यात होणाऱ्या सनबर्न म्युझिकल काॅन्सर्टमध्ये स्फोट घडवण्यासाठी नालासोपारा येथे शस्त्रसाठा लपवण्यात आल्याचे उघडकीस आले होते. यानंतर एटीएसने राज्याच्या कानाकोपऱ्यातून या कटात सहभागी असणाऱ्यांना ताब्यात घेत, सहभाग निश्चित होताच अटक करण्यास सुरूवात केली. या सर्वांमागे अमोल काळेचा सहभाग कालांतराने निश्चित झाला. या सर्व आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सापडलेल्या कागदपत्रांमुळे काही गोष्टी अद्याप अस्पष्ट आहेत. त्यामुळे या सर्व आरोपींची माहिती घेण्यासाठी सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करणं गरजेचं असल्याचं कारण न्यायालयात सादर करत एटीएसने अमोलसह त्याचे २ साथीदार अमित बद्दी आणि गणेश मिस्त्री यांच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने १२ ऑक्‍टोबरपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. नालासोपारा येथील स्फोटकांच्या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरसह एकूण १२ आरोपींना अटक केली आहे.

Copy