दानवेंच्या प्रतिमेला चपलांचा हार

0

वरणगाव। रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांना बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह वरणगाव शहरातील बसस्थानक चौकात शिवसेनेतर्फे जोडामारो आंदोलन गुरुवार 11 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी शेतकर्‍यांच्या तूर खरेदीबाबत काय बोलावे. एक लाख टन खरेदी केली तरी शेतकरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तूरीला भाव नाही, अशी रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळे दानवेंनी उधळल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असल्याने महाराष्ट्रासह दानवेंवर चोहोबाजूंनी टिका होत आहे. वरणगाव परिसरातील शेतकरीवर्ग व शिवसैनिकांनी महामार्गावरील बसस्थानक चौकात रावसाहेब दानवे यांच्या फोटोला जोड्याचा हार घालून, जोडे मारो आंदोलन करून आपला रोष प्रकट केला.

वरणगाव येथे यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, दर्यापूर सरपंच सुनिल कोळी, नितीन सोनवणे, प्रकाश कोळी, प्रमोद पाटील, किशोर कोळी, रमेश धरणे, संजय वायकोळे, नितीन देशमुख, निलेश ठाकुर, गिरीष जैन आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगरात पुतळादहन
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी दानवेंचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला़. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकप्रमुख छोटू भोई, अफसर खान, विठ्ठल तळेले, सुनील पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, गोपाळ सोनवणे, साबीर पटेल, दिलीप मराठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होत़े. प्रसंगी नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांना निवेदन देण्यात आल़े. दरम्यान, कार्यकर्त्यांनी दानवेंचा पुतळा दहनाचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षक अशोक कडलग व सहकार्‍यांनी तो हाणून पाडला.

राष्ट्रवादी- कडून निषेध
रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याचा वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेंद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, दिनेश चौधरी, दिपक मराठे, गोविंदा गावडे, अमोल पाटील, विजय माळी, निलेश देशमुख, विनोद माळी, पप्पू जकातदार, किरण माळी, संदिप माळी, रविंद्र चौधरी, नरेंद्र भोई, राजेंद्र सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात घोेषणाबाजी करुन कारवाईची मागणी केली आहे.