दादावाडीत गळफास घेवून तरूणीची आत्महत्या

0

जळगाव : आई व भाऊ लग्न पत्रिका जुळविण्यासाठी पंडीताकडे गेले होते. तेथून परत येत नाही तोच तरुणीने गळफास घेवुन जिवनयात्रा संपविली. ही घटना दादावाडीतील वृदांवन पार्कजवळ दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे. मयत तरुणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयासह घरी आक्रोश केला. तर भावाचे मृतदेह पाहताच अवसान गडाले होते.

स्नेहल महेंद्र जावरे (वय 23 रा. वृदांवन पार्क, दादावाडी) हे मयत तरुणीचे नाव आहे. वडील महेंद्र रामचंद्र जावरे, आई सुरेखा, भाऊ शामलाल व बहिण शितल जावरे यांच्यासोबत ती जळगावात राहते. वडील महेंद्र जावरे हे पाटबंधारे विभागात शाखा अभियंता होते. ते सेवानिवृत्त झाले असून घरीच आहेत. तर बहिण शितल हिचे लग्न झाले असुन ती सांगली येथे सासरी राहते. स्नेहल जावरे हिचे आयटीमध्ये एम.ई झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्याने तिच्या विवाहासाठी स्थळ पाहणे सुरू होते. एका ओळखीचे स्थळ चालुन आले होते. त्या मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळविण्यासाठी आई सुरेखा व भाऊ शामलाल जावरे एका पंडीताकडे गेले होते. दुपारी 12.15 च्या सुमारास शामलाल आईला घेवून घरी परतला. यावेळी स्नेहल जावरेच्या बेडरुममध्ये भावाने डोकावून पाहिले. त्याला बहिणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसुन आले. बहिणीची अवस्थापाहुन भावासह आई आरोडाओरड करीत आक्रोश केला.

शेजार्‍यांनी दाखल केले रुग्णालयात
शामलाल, सुरेखा यांच्या आक्रोशामूळे शेजारी असलेले जैन हिल्समधील सुरक्षा रक्षक गणेश तोताराम गायकवाड, दिपक माणिक भोई यांच्यासह परिसरातील नागरीकांनी स्नेहलला गणपती हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यावेळी तपासण्या करुन तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सुचना डॉक्टरांनी दिल्या. तत्काळ जिल्हा रुग्णालयात स्नेहल हिला डॉ. प्रविण पाटील यांनी मृत घोषीत केले. सामान्य रुग्णालयात स्नेहलला मयत घोषीत केल्यानंतर वडील महेंद्र जावरे यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. तालुका पोलीस ठाण्याचे अरुण सोनार यांच्यासह कर्मचार्यांनी नातेवाईकांचे जाबजबाब घेतले. सांगली येथून बहिण शितल जळगावात आल्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.