दादावाडीतील ‘त्या’ तरूणीची प्रेमसंबधातून आत्महत्या

0

जळगाव । शहरातील दादावाडी परिसरातील तरूणीने कुटुंबिय बाहेर कामानिमित्त गेल्यानंतर राहत्या गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 2 जानेवारीला घडली होती. या आत्महत्तेचे रहस्य उलगडले असून प्रियकराने वारंवार लग्न करण्याचे आमिष दाखवून देखील लग्न न केल्यामुळे या आमिषाला बळी पडून ‘त्या’ तरूणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आले. याप्रकरणी तरूणीची वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकराविरूध्द आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटे बोलून लग्नाचे दाखविले आमिष
गुजराथ पेट्रोल पंपजवळील दादावाडी परिसरात गुरुदत्त हौसिंग सोसायटीमधील राहणारी स्नेहल महेंद्र जावरे या तरणीचे प्रसाद नंद (रा.अकोला) याच्याशी 2007 पासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रसाद याने प्रेमसंबंध असतांना देखील 2 जानेवारी 2016 रोजी दुसर्‍या मुलीशी विवाह केला. लग्न केल्यानंतरही प्रसाद याने स्नेहल हिच्याशी प्रेमसंबंध ठेवून तिला वारंवार मेल व मोबाईलद्वारे संपर्क ठेवून तुझ्याशीच लग्न करेल असे आमिष दाखवले. परंतू प्रसाद याने भुलथापा देवून खोटे बोलून स्नेहल हिच्याशी लग्न केले नाही. त्यामुळे खोटे बोलून लग्नाचे आमिष दाखवून लग्न केले नाही म्हणून स्नेहील हिने 2 जानेवारीला कुटूंबिय घराबाहेर गेले असता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज स्नेहल हिच्या वडीलांनी तालुका पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून समोर आली. दरम्यान, याप्रकरणी महेंद्र रामचंद्र भोई यांच्या फिर्यादीवरुन रविवारी तालुका पोलिस स्थानकात प्रसाद नंद याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला