दाऊद गँगकडून मुख्यमंत्र्यांना फोन; मातोश्री उडवून देण्याचा धमकी

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुबई वरून एका अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. दाऊद गँगकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारण्याची आणि मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद गँगमधून बोलत असल्याचे धमकी देणाऱ्यांनी सांगितले आहे. मातोश्री बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पोलीस या फोनचा शोध घेत आहे. गृहमंत्र्यांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दुबईहून या अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती येत आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, फोन करणारी अज्ञात व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.