Private Advt

दांडेकर नगरात एकाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : कारण नसतांना चौघांनी एकाला शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केली. ही घटना दांडेकर नगरात घडली. याबाबत रविवार, 19 जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
संजय प्रभाकर बागुल (52, दांडेकर नगर, पिंप्राळा रोड, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. महानगरपालिकेत ते चालक म्हणून नोकरीला आहे. शनिवार, 18 जून रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ते घरी आई-वडीलांसोबत बसलेला असतांना त्यांच्या अंगणात त्यांची कार उभी असतांना काही तरुण थापा मारून शिवीगाळ करत होते. याबाबत त्यांनी हटकल्याने राग आल्याचे चाौघांनी संजय बागुल यांना महेंद्र समाधान सपकाळे (रा. बुध्द नगर), उमाकांत वाघ (मिराबाई नगर, पिंप्राळा), राकेंश मिलिंद जाधव (रा.मढी चौक, पिंप्राळा), आणि एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात महेंद्र सपकाळे याने चॉपरने वार केले तर उमांकात वाघ याने फायटरने बेदम मारहण केली तर संजय बागुल यांच्या आई-वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संजय बागुल यांनी रविवार 19 जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (रा.बुध्द नगर), उमाकांत वाघ (रा. मिराबाई नगर, पिंप्राळा), राकेंश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा), आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निलेश पाटील करीत आहे.