दहिवेल घरफोडीची उकल : लोंढानाला येथील आरोपी जाळ्यात

0

10 तोळे वजनाचे दागिने जप्त : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कामगिरी

धुळे- साक्री तालुक्यातील दहिवेल येथे मार्च महिन्यात झालेल्या घरफोडीची उकल करण्यास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. धुळे तालुक्यातील लोंढा नाला येथील भिका सदा भोई याला संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 10 तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे म्हणाले. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह मालमत्तेविरुध्द गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत़ त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यासह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पथक तयार केलेले आहेत़

सहा महिन्यानंतर दहिवेल घरफोडीचा उलगडा
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे 4 मार्च 2018 रोजी घरफोडीची घटना घडली होती़ वडीलांच्या औषधोपचारासाठी नाशिक येथे कुटुंबिय गेल्याने त्यांचे घर बंद होते़ बंद घराचा फायदा चोरट्याने घेतला आणि त्यांचे घर फोडले़ चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 57 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता़ कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली़ त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यामुळे साक्री पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल संदीप थोरात, नथा भामरे, पोलीस कर्मचारी कुणाल पानपाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, उमेश पवार, रविकिरण राठोड, मनोज बागुल, विशाल पाटील, मायुस सोनवणे या पथकाने तपासाची चक्रे फिरविली़ त्यात हेड कॉन्स्टेबल संदीप थोरात यांना तपासाकामी विशेष सुचना देण्यात आल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Copy