दहिवद विकासोवर शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय

0

अमळनेर । टाकरखेडा येथून जवळच असलेल्या दहिवद येथील विकासोवर शेतकरी पॅनलने आपल्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्याने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेली दहिवद विकासोच्या निवडणुकीत विद्यमान जि.प.सदस्या मिनाताई पाटील व माजी सरपंच रमेश पाटील यांच्या शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून मात्तबरांनी विकासो बचाव पॅनलचा धुव्वा उडविला.

विजयी पराभूत झालेले उमेदवार
रविवार 15 जानेवारी रोजी मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यात शेतकरी पॅनल व वि.का.सो. बचाव पॅनेल यांच्यात लढत होती. शेतकरी पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच रमेश पाटील, सरपंच सोनी माळे, जि.प.सदस्या मिना पाटील, प्रविण माळी, निंबा पाटील, आनंता माळी यांनी तर बचाव पॅनलचे नेतृत्व दिनकर पाटील, माजी.जि.प.सदस्य ए.टी.पाटील, माजी सभापती प.स.अमळनेरचे सुभाष पाटील, जयवंत पाटील, प्रशांत भदाणे यांनी केले. विजयी उमेदवारांमध्ये अनिल माळी, भिमराव माळी, जीवन माळी, खंडेराव माळी, भटू पाटील, रामभाऊ पाटील, शरद भदाणे, शिवाजी पाटील, मालू पाटील, उषाबाई पाटील, रविंद्र माळी, गुलाब साळुंखे व ज्ञानेश्‍वर धनगर हे आहेत तर दिलीप भदाणे, जगदीश भदाणे, गणेश माळी, मंगा माळी, संजय माळी, धनंजय पाटील, जगन्नाथ पाटील, पांडूरंग पाटील, मंगला पाटील, शैला पाटील, सुनिल पाटील, हिमंतराव सोनवणे, खंडू धनगर यांचा समावेश होता.

यांनी घेतले परीश्रम : निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी माणिक भदाणे, सुदाम धनगर, पन्नालाल मावळे, सत्यमामा पाटील, राजाराम सोनवणे, मोतीलाल माळी, भिमराव गोसावी, जितेंद्र पाटील, भिकन सोनवणे, मधुकर पाटील, दिपक जाधव, गुलाब कुंभार, सोमा माळी, छबीलाल पाटील, रविंद्र मगरे, कैलास पाटील, किरण माळी, डॉ.प्रभाकर पाटील, गोरख पाटील यांनी मेहनत घेतली तर निवडणूक निर्णय अधिकारी एन.के.पाटील, सचिव भगवान पाटील, लिपिक ईश्‍वर महाजन यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडली.