दहिगावात मद्याच्या नशेत एकाने दुचाकी पेटवली

0

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील मराठी मुलांच्या शाळेजवळ असलेल्या वस्तीतील तुषार दिलीप महाजन या इसमाने त्याच्या मालकीची स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 19 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. तुषार महाजन याने दारूच्या नशेत त्याचे घरातील किचन रूमची तोडफोड करीत दरवाजा आणि गॅलरीचे नुकसान करून त्याच्या मालकीची दुचाकी जाळली. त्यानंतर त्याचे घरातील गॅस सिलिंडर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र शेजारील लोकांच्या सतर्कतेने हा अनर्थ टळला. शेजारील लोकांनी सिलिंडर ताब्यातून हिसकावून बाजूला नेले अन्यथा त्याने गॅस हंडी सुद्धा पेटविली असती. या घटनेची खबर तत्काळ पोलिस पाटील संतोष जीवराम पाटील यांनी यावल पोलिसात दिली.