दहिगावात बालिकेवर नराधमाचा अत्याचार

25 वर्षीय नराधमाला यावल पोलिसांनी केली अटक : दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची समाजमनातून मागणी

यावल : अवघ्या तीन वर्षीय बालिकेवर 25 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील दहिगाव येथे घडल्याने यावल तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी नराधमाला यावल पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. कैलास प्रल्हाद पाटील (25, दहिगाव, ता.यावल) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे.

पैशांचे आमिष दाखवत अत्याचार
यावल तालुक्यातील दहिगाव येथे शेतमजूर कुटुंबातील अवघ्या तीन वर्षीय बालिकेला नराधम आरोपी कैलास पाटील याने दहा रुपये देण्याचे आमिष दाखवत घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 8 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. पीडीतेची आई शेतातून घरी आल्यानंतर तिने मुलांची विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. शेतमजूर कुटुंबाने या घटनेनंतर शनिवारी यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद नोंदवल्यानुसार संशयीत आरोपी कैलास प्रल्हाद पाटील (25, रा.दहिगाव, ता.यावल) याच्याविरूध्द भादंवि कलम 376, 376-अ, 375, 354, तसेच पोक्सो कायद्यातील कलम 3, 4 आणि 8 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम खान यांनी दहिगावातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास उपनिरीक्षक विनोद मधुकर खांडबहाले करीत आहेत.

Copy