दहिगावातील 44 वर्षीय शेतकर्‍याची आत्महत्या

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील 44 वर्षीय शेतकर्‍याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 9 रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश देविदास महाजन (44, रा. दहिगाव, ता.यावल) असे मयत शेतकर्‍यांचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
योगेश महाजन हे मुलगी डिंपल आणि मुलगा उमेश यांच्यासह दहिगाव येथे वास्तव्यास होते. त्याचठिकाणी त्यांचे मोठे भाऊ भानुदास देविदास महाजन हेदेखील वास्तव्यास आहेत. तीन वर्षांपुर्वी योगेश महाजन यांची पत्नी अनिताचे निधन झाले असून शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी योगेश महाजन हे शेतात कामाला निघुन गेले व शेतात जावून विषारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या शेतातील शेजारी शेतकरी निंबादास रेवा महाजन यांचा लक्षात आला. त्यांनी तातडीन भानुदास महाजन यांना फोनद्वारे माहिती कळवल्यानंतर महाजन यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी मयत घोषीत केले. शेतकर्‍याने आत्महत्या का केली?याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी भानुदास महाजन यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.

 

Copy