Private Advt

दहिगावातील तरुणीची विष प्राशनाने आत्म्हत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुजाता संतोष पाटील (20) असे मयत तरुणीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगर परीसरातील रहिवासी असलेली तरुणी सुजाता संतोष पाटील (20) हिने रविवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरात काहीतरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरुणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (48) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.