दहावी, बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी होणार

0

मुंबई: कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होत असते मात्र नोव्हेंबर सुरु झाले असतांना देखील शाळा, महाविद्यालये सुरु झालेली नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहावी, बारावीची परीक्षा में महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शैक्षणिक वर्ष लांबल्याने अभ्यासक्रम देखील २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. में पूर्वी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.