दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर केले जाते. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार आहे.

Copy