दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कलचाचणीचे आयोजन

0

जळगाव । दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी कोणते माध्यम निवडावे तसेच दहावीच्या विद्यार्थ्याची क्षमता तपासणीसाठी लेखी परीक्षे अगोदर कलचाचणी घेण्यात येत असते. विद्यार्थ्याची कलचाचणी तपासणीसाठी जिल्ह्यातील शाळांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 9 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

आठ विषयाचे प्रत्येकी 20 प्रश्‍न विचारले जाणार
दहावीतील विद्यार्थ्याची शंभर टक्के कलचाचणी करण्यात येत असते. कलचाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी कोणत्या विषयात अधिक तरबजे आहे हे निष्पण होते. कलचाचणी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत असते. एकच परीक्षा घेण्यात येणार असून आठ विषयाचे प्रत्येकी 20 प्रश्‍न या परीक्षेत विचारले जाणार आहे. ज्या विषयात विद्यार्थ्यानी अधिक गुण मिळविले त्या विषय शाखेत भविष्यात प्रवेश घेऊन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.

कलचाचणी संबंधी बैठक
कलचाचणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यााठी शाळांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. कलचाचणी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने संगणक समन्वयक नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यातून एकुण 15 तालुका समन्वयकांची नेमणुक करण्यात येणार आहे. या समन्वयकांची बैठक सोमवारी 6 रोजी मु.जे.महाविद्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत समन्वयकांना ऑनलाईन प्रणाली समजविली जाणार आहे. समन्वयक विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहे.