दहावीच्या विद्यार्थ्यांचा महामार्गावर अपघात

0

नवापूर  । तालुक्यातील दुधवे येथील दहावीची परिक्षा देत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील भडभुंजा फाट्याजवळील नागपूर-सुरत महामार्गावर अपघात झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांचा गॅसटँकर खाली आल्याने जागीच मृत्यु झाला. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुधवे गावाहून मित्रांबरोबर 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील लक्कडकोट येथे आदिवासी समाजातील लोकप्रिय सोंगड्या पार्टी पाहण्यासाठी मोटरसायकल क्रमांक एम.एच.39.0197 वर गेले होते. त्यादरम्यान भडभुंजा फाट्याजवळील नागपूर-सुरत महामार्गावर सुरतकडून धुळ्याकडे जात असलेल्या गॅसटँकर क्रमांक जी.जे.06 ए.यु 6250 भरधाव वेगात मोटरसायकली मागून धडक दिल्याने मोटरसायकल स्वार रोहित सुरेश नाईक (वय 16) ,युवराज रविंद्र वळवी (वय 16) दोन्ही रा दुधवे तालुका नवापूर यांच्या गॅसटँकर खाली येऊन डोक्याचा भाग चाकाखाली दाखला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वंशाचे दिवे विजले
गॅसटँकरने मोटरसायकली धडक दिल्याने गॅस टँकर दोन पटली मारून पलटला घटनास्थळावरून गॅसटँकर चालक फरार झाला असल्याची माहिती गुजरात मधील उच्छल पोलिसांनी दिली. यासंदर्भात उच्छल पोलिस ठाण्यात गॅसटँकरचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा उच्छल सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक गावित यांनी शवविच्छेदन करून प्रेत पालकांचा ताब्यात दिले. युवराज वळवीला वडील नाहीत फक्त आई आणि एक बहीण आहे.तर रोहितला भाऊ नाही एक बहीण आईवडील आहेत. या अपघातात दोन परिवाराचा वंशाचा दिवा विजले आहेत.