दहावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

0

मुंबई : विद्यार्थी, शिक्षक, संघटना यांच्या आक्षेपानंतर अखेर राज्य शिक्षण मंडळाने २०१७च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. नवे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत सूचना, हरकती विभागीय मंडळांकडे तसेच राज्य शिक्षण मंडळाकडे १५ दिवसांत लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये राज्य शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २९ आॅक्टोबरपासून टाकण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थी, पालकांनी काही आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची गंभीर दखल घेऊन शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.