BREAKING: दहावीचा निकाल जाहीर; कोकण बोर्ड अव्वल तर औरंगाबाद सर्वात कमी

0

मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी २९ रोजी जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यात मुली 96.91टक्के तर मुले 93.99 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तर औरंगाबाद बोर्डाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. ऑनलाईन पद्धतीने दुपारी  १ वाजता निकाल पाहता येणार आहे.

बोर्ड निहाय निकाल
पुणे बोर्ड – 97.34%

अमरावती बोर्ड 95.14%

मुंबई बोर्ड 96.72%

नागपूर बोर्ड 93.84%

लातूर बोर्ड 93.09%

नाशिक बोर्ड 93.73%

कोल्हापूर बोर्ड 97.64%

औरंगाबाद बोर्ड (सर्वात कमी) – 92%