दहावींच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला निरोप

0

अमळनेर । येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरूजी नूतन व् कन्या हायस्कूल मध्ये इ 10 वींच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, हेमकांत पाटील, दिनेश गोकुळ पाटील इंजी. प्रियंका चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांच्या सुरूवातीला साने गुरूजी व् सरस्वती पूजन करण्यात आले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. डी. देशमुख यांनी केले त्यात त्यांनी शाळेची गुणवत्ता व् विकास याबद्दल माहिती दिली यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास डॉ शेख शकील जलोद्दीन, गुणवंतराव पाटील, अनीता बोरसे, डॉ दिनेश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व् शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी तर आभार डी. के. पाटील यांनी व्यक्त केले.