दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकन स्टाइल आवश्यक: बिपीन रावत

0

नवी दिल्ली: जगातून दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची गरजेची आहे. अमेरिकन स्टाइलनेच दहशतवाद संपुष्टात आणला जाऊ शकतो’, असे विधान देशाचे पहिले सरसेनाप्रमुख (सीडीएस) बिपीन रावत यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केले आहे.

कट्टरतावाद आणि काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर अशा गंभीर प्रश्नांवरही रावत यांनी भाष्य केले. ‘दहशतवाद संपुष्टात आणणे अत्यंत गरजेचे आहे. अमेरिकेने ९/११ हल्ल्यानंतर ज्यापद्धतीने आक्रमक भूमिका घेत जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं. त्याच पद्धतीनं सर्व देशांनी दहशतवादाविरोधात लढायला हवे’, असे बिपीन रावत म्हणाले. शाळा, विद्यापीठांसोबत धार्मिक ठिकाणी कट्टरतावादाचं शिक्षण देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची गरज असल्याचं रावत म्हणाले. कट्टरतवाद पसरवणाऱ्यांची दुखती नस शोधून त्यांच्यावर कारवाई केली तर देशातून कट्टरतवादाचाही नायनाट होऊ शकतो, असं मत रावत यांनी व्यक्त केलं.

Copy