दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद; दोन दहशतवादी ठार

0

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात आज सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

रेडवानी गावातील एका घरामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तरित्या ऑपरेशन राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली. पाच तासांमध्ये चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुर्दैवाने यादरम्यान, एक जवान शहीद झाला आहे.

याव्यतिरिक्त, पुलवामामधील त्रास परिसरातही दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. हाफू गावात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

Copy