दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; दोन जवान जखमी !

0

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले आहे. श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. याच तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सीमेपलिकडून वारंवार घुसखोरी केली जाते. विशेषतः दहशतवाद्यांकडून वारंवार सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्यात येते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यापासून असे प्रयत्न झाले. मात्र, लष्कारानं हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.