दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला; लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा

0

बारामुल्ला: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर याचा खात्मा करण्यात यश आले आहे. आज सकाळीच दहशतवाद्यांनी केलेली हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान आणि पोलीस दलातील एका स्पेशल पोलीस ऑफिसर शहीद झाले. मात्र या हल्ल्याचा बदला भारतीय जवानांनी घेतला असून लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

बारामुल्लातील क्रिरी भागात हा हल्ला झाला होता. या नंतर हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती व परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान, दुपारी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली व यात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.