दर कमी करण्याचा निर्णय लोकांच्या डोळयात धुळफेक करणारा-राष्ट्रवादी

0
मुंबई- पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्याचा आणि त्यावरील व्हॅट कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय म्हणजे लोकांच्या डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्र व राज्यसरकारने पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त करण्याचा आणि त्यावरील व्हॅट दीड रुपयाने कमी करण्याचा निर्णय आज घेतला त्या निर्णयावर नवाब मलिक बोलत होते.
आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलववर ९ रुपये असलेली एक्साईज डयुटी वाढवून या सरकारने १९.४८ केली. डिझेलवरील ३ रुपये असलेली एक्साईज डयुटी वाढवून १५.३३ केली. सरकारला जनतेला दिलासा दयायचा असल्यास आघाडी सरकारच्या काळातील एक्साईज डयुटीचे दर पुन्हा लागू करावेत असा सल्ला नवाब मलिक यांनी सरकारला दिला आहे.
केंद्रसरकार पाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट २.५० रुपयाने कमी करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केलाय.राज्यसरकारचा हा निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असून व्हॅट कमी करावयाचा असल्यास सरकारने दारुवरचा अतिरिक्त कर आणि दुष्काळावरचा करही कमी करुन दाखवावा असे जबरदस्त आव्हान नवाब मलिक यांनी सरकारला दिले आहे.
Copy