दर्शनबारी इंद्रायणी नदी घाट लगत तिठा सुटला

0

न्यायालयाने जागा वापरास दिली परवानगी

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील दर्शनबारी व अग्निशमन केंद्राचे राज्य शासनाने आरक्षण वगळले. यामुळे दाखल दाव्यात मुंबई उच्च न्यायालयाने जैसे थे आदेश दिले. कार्तिकी यात्रा काळात दर्शनबारीची गरज लक्षांत घेऊन 21 नोव्हेबर ते 12 डिसेंबर या मर्यादित काळात संबंधीत जागा दर्शनबारीसाठी वापरास न्यायालयाने परवानगीचे आदेश दिले, अशी माहिती बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी दिली. या निर्णयाने यात्रा काळात दर्शनबारीचा तिढा सुटला आहे. संस्थानाने दर्शनबारी व मंडप उभारण्याचे काम सुरु केल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांनी सांगितले.

आरक्षण शासनाने उठवले

नगरपरिषद सुधारित विकास योजना दुसरी सुधारित आराखड्यात भाविकांसाठी इंद्रायणी नदी घाटा जवळील जागेत दर्शनबारी व अग्निशमन केंद्राचे आरक्षण होते. मात्र ज्ञानेश कन्या ज्ञानचक्षू गुलाबराव महाराज यांचे स्मारक, ग्रंथालय, अध्यात्मिक कार्यासाठी जागेची गरज असल्याने हे आरक्षण वगळण्याची मागणी केली. यावर संस्थेच्या मागणी प्रमाणे आळंदीतील विकास आराखड्यातले आरक्षण शासनाने उठवले आहे. या शासनाच्या निर्णयावर आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील यांनी आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दावा केला होता. दावा न्याय प्रविष्ठ असून यावर नुकतीच त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान आरक्षणाची गरज असल्याने ते कायम रहावे अशी मागणी यापूर्वीचे सुनावणीत झाली. सुनावणीनंतर आरक्षणास जैसे थेचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

याबाबत माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील म्हणाले की, न्यायालयाचे आदेशाने आहे त्याच ठिकाणी दर्शनबारी व मंडप आता करण्यात येणार आहे. याचिका दाखल केल्याने न्यायालयाने दखल घेतली आहे. या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी देखील आळंदीस भेट देत दर्शनबारीच्या नियोजनास गती दिली. यावेळी प्रांत आयुष प्रसाद, तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नगराध्यक्षांना जागा मालकांशी चर्चा करण्यास सांगितले. यामुळे आळंदीतील जागेचे मालक व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आळंदीत चर्चा केली. दर्शनबारी व मंडपास जागा उपलब्द्ध करून देण्यास सहकार्य करणार असल्याची ग्वाही जागा मालकांनी दिली असल्याचे सांगितले.