दर्यापूरच्या सरपंच वंदना चौधरी यांचा सत्कार

0

भुसावळ- तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या वंदना सुधाकर चौधरी यांची निवड झाल्याने त्यांचा शनिवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दर्यापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोठ्या फरकाने शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन सोनवणे यांचा पराभव करून वंदना चौधरी निवडून आल्या होत्या. सत्कार समारंभास ग्रामपंचायत सदस्य छाया तायडे, आशिष मेघे, लक्ष्मी सपकाळे, कुसुम गायकवाड, रामा फोंडे, अनिता लोखंडे, सुनिता सोनवणे, गणेश गावळे, अजय चौधरी, बोधीसत्व अहिरे, सिद्धार्थ सपकाळे, विजय तायडे, अरविंद पाटील, डॉ.विजय सुरवाडे, सुधाकर चौधरी, भाजपा तालुका उपाध्यक्ष विलास पाटील आदी उपस्थित होते.