दरोडेखोरांची टोळी जेरबंद!

0

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ हरियाणा येथील ट्रक चालकाला मारहाण करुन लुटणार्‍या शिरपूरमधील सहा दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचे ४ हजार ६०० रुपये, एक मोबाईल, एक कार टेप असा १६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अवघ्या चारच दिवसात सपोनि ज्ञानेश्‍वर वारे यांनी दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींकडून आणखी काही रस्तालुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. परराज्यातील वाहनांना टार्गेट करुन लुटण्याचा या टोळीचा फंडा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तोल नाक्याजवळच झाला प्रकार
हरिओम विद्यादत्त गौतम रा.खिजापूर जि.सोनीपत हरियाणा हे ट्रक चालक त्यांच्या क्लिनरसह दि.११ रोजी रात्री ट्रक क्र.एच.आर. ६९/ बी.६१३८ ने हरियाणातील भागपतकडून अडिच लाखांचे २८०० नग कंबल घेवून सोलापूरकडे जात होते. दि.१२ जानेवारी रोजी रात्री सोनगीर टोल नाक्याजवळ स्विफ्ट गाडी क्र.एम.एच. १८/एजे.७४६८ या वाहनाला धक्का लागल्याचे कारण करुन दोन व्यक्तींनी ट्रक चालक गौतमला अडविले. त्यानंतर व्हिस्टा गाडी क्र.एम.एच.१८/ए.जे.१९४७ वाहनातील आणखी सपोनि वारे यांनी अवघ्या काही तासांत लावला दरोड्याचा छडा हा लुटीचा प्रकार सोनगीर टोल नाक्याजवळच झाला. यावेळी तेथील काही कर्मचार्‍यांनी हा वाद सुरु असतांनाच स्विप्ट गाडीची पावती न फाडता तिला परतावून लावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी जर टोल कर्मचार्‍यांनी सदरची स्विप्ट गाडीची पावती फाडली असती तर ती रेकॉर्डवर आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आली असती. असे न झाल्याने स्विप्ट गाडीचे रेकॉर्ड झाले नाही. मात्र, ट्रक चालक गौतम याने त्या स्विप्ट गाडीचा क्रमांक बघितला असल्याने आरोपींना पकडण्यात यश आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. टोल कर्मचार्‍यांनी असे प्रकार किंवा अपघाताचे प्रकार, वादाचे प्रकार परस्पर न मिटविता तात्काळ सोनगीर पोलिसांना कळविणे अपेक्षीत असल्याचे सपोनि वारे यांनी सांगितले.

टोल कर्मचार्‍यांनी घटनांची माहिती कळवावी: सपोनि वारे
महामार्गावर बाहेरच्या राज्यातील ट्रक चालक किंवा अन्य वाहन चालकांना अपघाताचे कारण पुढे करुन थांबवायचे. किंवा थोडाफार धक्का लागल्याचे कारण करुन वाहनचालकांना दमबाजी करायची, त्यांना मारहाण करायची. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोकड, वाहनातील महागडे साहित्य लुटून पसार व्हायचे, अशी शिरपूरमधील या सहा संशितांची गुन्ह्याची पध्दत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी असे किती गुन्हे केले आहेत? परराज्यातील किती वाहन चालकांना लुटले आहे? याचा शोध आम्ही घेत असल्याची माहिती सपोनि वारे यांनी दिली.

चालकाने दिली माहिती
अपघाताचे कारण पुढे करुन लुटीचा फंडा चार व्यक्ती तेथे आले. ते स्विफ्ट वाहनातील व्यक्तींचे साथीदारच होते. या सहा जणांनी चालक गौतमला मारहाण करुन नुकसान भरपाई मागितली. चालक गौतमकडून ४ हजार ६०० रुपये, एक मोबाईल, एक कारटेप, १२ नग कंबल असा १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर सहा जण तेथून पसार झाले. चालक गौतम याने सोलापूर येथे कंबल पोहोचवून त्यानंतर काल थेट सोनगीर पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी हरिओम गौतम यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुध्द भादवि ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांनी चालक गौतम याच्याकडून सर्व सविस्तर माहिती घेतली. यावेळी गौतम याने स्विप्ट गाडीचा क्रमांक बघितला असल्याने तो त्याने पोलिसांना दिला.

सापळा रचून केली कारवाई
ज्ञानेश्‍वर वारे यांनी तात्काळ आरटीओ कार्यालयातून या क्रमांकाच्या गाडीची माहिती मागविली. त्यानंतर शिरपूर पोलिसांची मदत घेवून सापळा रचून सुभाष बाबुराव वाघ (वय ३३), संजय बाबुराव वाघ (वय ३५), सचिन राजभाऊ निकम (वय ३०), महेंद्र रणजितसिंग राजपूत (वय ३१), कमरु जमाल अब्दुल करीम मन्यार (वय ३५), जितेंद्र दिलीप चौधरी (वय ३०) सर्व रा.या सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेले ४ हजार ६०० रुपये, एक मोबाईल, एक कारटेप, १२ कंबल असा मुद्देमाल जप्त केला. चालक आणि सोनगरी पोलिसांच्या तत्परतेने शिरपूरमधील सहा दरोडेखोर जाळ्यात आले. पोलीस अधीक्षक चैतन्या एस. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे, उपनिरीक्षक सी.एस.चातुरे, हवालदार रमेश उघडे यांनी ही कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.