दरमहा 25 हजारांची खंडणी द्या, अन्यथा जीवे ठार मारू : भुसावळातील विष्णू पथरोडसह सहा जणांविरोधात गुन्हा

भुसावळ : सरकारमान्य देशी दारू दुकान मालकाने दरमहा 25 हजार रुपये खंडणी द्यावी अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याप्रकरणी विष्णू पथरोडसह सहा जणांविरोधात भुसावळ शहर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली. या प्रकरणी आदिल ऋषी कवीना (55, अमरदीप टॉकीज रोड, टेमी व्हिला, भुसावळ) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. रविवार, 3 ऑक्टोबर 6.45 ते 20.45 दरम्यान संशयीत आरोपी विष्णू पथरोड, आरोपी विष्णूचा भाचा विकी, सागर, सोबत अन्य अनोळखी (नाव, गाव पूर्ण माहिती नाही) यांनी जुना सातारा भागातील ताडीच्या मळ्याजवळ तक्रारदार कवीना यांना अडवून सरकारमान्य देशी दारू दुकान चालू देण्यासाठी दरमहा 25 हजार रुपये द्यावे अन्यथा जीवे ठार मारू, अधी धमकी दिली. तक्रारदाराने शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विनोद गोसावी करीत आहेत.

Copy