दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार

0

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे. सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘कुणाच्या दबावाचा प्रश्नच नाही, संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार आहे’ असे आज सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

या प्रकरणावरून विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आठ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने, भाजपा नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

Copy