दत्त जयंतीनिमित्त धानोर्‍यात महाप्रसाद

0

चोपडा : तालुक्यातील धानोरा येथे मंगळवार 13 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. धानोरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी विशाल राठोड यांनी या ठिकाणी श्री दत्ताचे मंदीर उभारलेले आहे. तेव्हापासून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाचे हे अकरावे वर्ष आहे. सर्व खर्च हा डॉ राठोड करतात. डॉ राठोड हे सध्या हिंगोली जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदीवासी विभाग येथे कार्यरत आहेत. तरी या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा.